12 वी नंतर या शाखेत इंजिनिअररिंग केल्‍यास मिळेल लाखोंचा पगार !

आजकाल बहुतांश पालक आपल्‍या मुलांना सामान्‍यत: ज्‍या शाखा आहेत त्‍यामध्‍येच इंजिनिअरिंग करायला लावतात, किंवा त्‍यांना जे सामान्‍य पर्याय दिसतात त्‍यापैकीच एक ते निवडतात, परंतू आता भविष्‍यात कोणत्‍या ब्रांचला किंवा शाखांना महत्‍व राहणार आहे, कोणत्‍या शाखेत जास्‍त पगार मिळू शकतो ते पाहुया….

Software Engineering / IT Field

सॉफ्टवेअरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, या पर्यायाला खूपच महत्‍व आले आहे. कारण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करून विद्यार्थी Google, Microsoft, apple, Amazon आणि इतर शेकडो कंपन्‍यांमध्‍ये करू शकतात, सॉफ्टवेअरच्‍या हजारो कंपन्‍या असल्‍यामुळे येथे संधी खूप आहेत. सॉफ्टवेअर इंजिनिअरला लाखोंचे पॅकेज मिळू शकते.

Artificial Inteligence (AI) & Machine Learning

या ब्रांच ला सध्‍या खूपच महत्‍व प्राप्‍त झाले आहे. जगात सध्‍या AI चीच चर्चा आहे आणि येत्‍या काळात AI चे महत्‍व किती तरी पटीने वाढणार आहे. आजच्‍या घडीला या मध्‍ये इंजिनिअरिंग करणारे खूपच कमी लोक आहेत. आपण Chat GPT ऐकले असेलच ज्‍यामध्‍ये काही माहिती विचारल्‍यास आपल्‍याला त्‍याचे उत्‍तर लगेच मिळते, किंवा Robot बद्दलही ऐकले असेलच. प्राप्‍त माहितीनुसार वार्षिक 8 लाखांपासून याची सुरूवात होते आणि अनुभवानुसार ती कोटीपर्यंतही जावू शकते.

Petrolium Engineering

ही ब्रांच सुध्‍दा चांगलीच चर्चेत आहे. या ब्रांच मध्‍ये क्रुड ऑईल आणि नॅचरल गॅस सारखे हाईड्रोकार्बन इत्‍यादी बद्दल शिक्षण दिले जाते. करिअरच्‍या दृष्‍टीने ही शाखाही महत्‍वपूर्ण आहे. यामध्‍येही वार्षिक लाखोंचे पॅकेज दिले जाते. वरील ब्रांच प्रमाणेच या ब्रांचलाही भारतात आणि विदेशातही महत्‍व आहे.

Aerospace Engineering

ही फिल्‍ड सुध्‍दा कोणत्‍याही शाखेपेक्षा कमी नाही, या शाखेतही आपणास खूप मोठ्या संधी आहेत. एरोस्‍पेस इंजिनिअरिंग, याला एअरोनॉटीकल इंजिनिअरिंग पण म्‍हटलं जातं. यामध्‍ये आकाशत चालणाऱ्या व्‍हीकल डिझाईन, डेवलपमेंट, निर्माण, टेस्‍टींग आणि संचालन अशा विविध गोष्‍टी शिकवल्‍या जातात. यामध्‍येही आपणास कमीत कमी 10 लाखांचे वार्षिक पॅकेज मिळू शकते.

Big Data Engineer

ही शाखा थोडी नवीन सारखीच आहे, परंतू याचे महत्‍वही दिवसेंदिवस वाढत आहे. 2020 च्‍या नंतर ही गतीने वाढणारी शाखा आहे. मोठमोठ्या कंपन्‍यांमध्‍ये डाटा एक्‍सपर्ट ची आवश्‍यकता असते. वार्षिक पॅकेज 5 लाखांपासून सुरूवात होते आणि ते अनुभवानुसार अनेकपटीने वाढू शकते.

यासह इतरही अनेक शाखा आहेत ज्‍यामध्‍ये आपणास वार्षिक लाखोंचे पॅकेज मिळू शकते, वरील सर्व शाखांना भारतातच नव्‍हे तर विदेशात सुध्‍दा मागणी आहे. त्‍यामुळे 12 वी नंतर मुलाला इंजिनिअरींग करण्‍याचा विचार असेल तर वरील पर्यायांचा सुध्‍दा विचार करावा, महत्‍वाचे म्‍हणजे मुलाचा अथवा मुलीची कोणत्‍या क्षेत्रात आवड आहे ते पण पहावे, यासाठी तज्ञ लोकांशी चर्चा केली तर अधिक योग्‍य राहील.

सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…

मित्रांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नियमित मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!